Sunday, August 30, 2009

रविवार, ३० ऑगस्ट २००९

नायगावकर काका, रविवार, ३० ऑगस्ट २००९
संसदेत महिला आरक्षण विधेयक संमत होईल काय?
    - ललिता सोळंकी, भिंगार

संसदेत सर्व महिला निवडून आल्या तरी हे विधेयक अशाच अवस्थेत राहील.
तुम्ही जर पाण्यात पडलात तर काय कराल?
    -अमोल फटांगरे, संगमनेर
बाहेर येऊन पंचाने अंग कोरडं करीन.
पृथ्वीतलावर प्रथम माणूस आला की बाई आली?
     - कुणाल कांबळे, तिसगाव, कल्याण
कुठल्याही नवीन ठिकाणी प्रथम बायकाच धावतात.
पूर्वीच्या काळात राजे परकीय आक्रमण झाल्यास स्वत: लढायला जात असत. आताचे पंतप्रधान, गृहमंत्री युद्धात लढायला का जात नाहीत?
- अमित गुगळे, पुणे
सिक्युरिटी प्रॉब्लेम.
आपण उभ्या आयुष्यात कधी कोणत्या प्रश्नाचे सरळ उत्तर दिले आहे का?
- वैभव पाटील, मुंबई
मला कितीही सरळ उभं राहायला सांगितलं तरी मी तिरका उभा राहतो
प्रेम करणे म्हणजे काय?
- अजिंक्य देवकाते, उद्गीर
लग्न होऊन मुले-बाळे झालेल्या सर्वांनाच हल्ली हा प्रश्न सतावतो.
शरदाचे चांदणे फिक्के तर पडत चालले नाही ना?
- धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर
वय होत गेले की, सगळेच फिक्के वाटत राहते. तरीही तुम्ही औरंगाबादच्या कलेक्टरकडे तक्रार करा.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे साऱ्यांनाच जमते का?
- भिकाजी कांबळे, पुष्पनगर (भूदरगड)
‘उजळणी’ नीट झाली असेल तर जमायला काय हरकत आहे?

0 comments:

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP