Sunday, August 30, 2009

रविवार, ३० ऑगस्ट २००९

नायगावकर काका, रविवार, ३० ऑगस्ट २००९
संसदेत महिला आरक्षण विधेयक संमत होईल काय?
    - ललिता सोळंकी, भिंगार

संसदेत सर्व महिला निवडून आल्या तरी हे विधेयक अशाच अवस्थेत राहील.
तुम्ही जर पाण्यात पडलात तर काय कराल?
    -अमोल फटांगरे, संगमनेर
बाहेर येऊन पंचाने अंग कोरडं करीन.
पृथ्वीतलावर प्रथम माणूस आला की बाई आली?
     - कुणाल कांबळे, तिसगाव, कल्याण
कुठल्याही नवीन ठिकाणी प्रथम बायकाच धावतात.
पूर्वीच्या काळात राजे परकीय आक्रमण झाल्यास स्वत: लढायला जात असत. आताचे पंतप्रधान, गृहमंत्री युद्धात लढायला का जात नाहीत?
- अमित गुगळे, पुणे
सिक्युरिटी प्रॉब्लेम.
आपण उभ्या आयुष्यात कधी कोणत्या प्रश्नाचे सरळ उत्तर दिले आहे का?
- वैभव पाटील, मुंबई
मला कितीही सरळ उभं राहायला सांगितलं तरी मी तिरका उभा राहतो
प्रेम करणे म्हणजे काय?
- अजिंक्य देवकाते, उद्गीर
लग्न होऊन मुले-बाळे झालेल्या सर्वांनाच हल्ली हा प्रश्न सतावतो.
शरदाचे चांदणे फिक्के तर पडत चालले नाही ना?
- धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर
वय होत गेले की, सगळेच फिक्के वाटत राहते. तरीही तुम्ही औरंगाबादच्या कलेक्टरकडे तक्रार करा.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे साऱ्यांनाच जमते का?
- भिकाजी कांबळे, पुष्पनगर (भूदरगड)
‘उजळणी’ नीट झाली असेल तर जमायला काय हरकत आहे?

Read more...

Sunday, August 16, 2009

मुख्यमंत्री
अशोक चव्हाण
म्हणाले
संकटावर
मात करण्यासाठी
जनतेने एकत्र येण्याची गरज
असली तरी
‘स्वाइन फ्ल्यू’ च्या संदर्भात
मात्र जनतेने पांगण्याची
गरज आहे.

स्वातंत्र्य मिळून
६० वष्रे होऊन गेली तरी
भारताने एकाही नव्या
रोगाचा शोध लावला नसल्याचा
आरोप रामदास कदम यांनी केल्याचे समजते.
स्वाइन फ्ल्यू बाबत प्रतिक्रिया देताना
देशीवादाचे खंदे पुरस्कर्ते
भालचंद्र नेमाडे
यांनी या विदेशी साथीचा तीव्र निषेध
केला आहे. देशीवादाच्या अभ्यासासाठी
ते सध्या युरोपात असल्याचे समजते.

नवविवाहितांनी
हनीमूनला जाताना
शक्यतो एकटय़ाने जावे
अशी सूचना आरोग्यमंत्री शोभा बच्छाव यांनी केली आहे.

टीव्हीच्या वाहिन्यांमधून
स्वाइन फ्ल्यूच्या विषाणूंचा
वेगाने प्रसार होत असल्याचा
निष्कर्ष एका सामाजिक संस्थेने
काढला आहे.

डिझायनर मास्क ऐवजी
गोरगरीब जनतेला
परवडतील असे मास्क
पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत
अशी मागणी डाव्या पक्षांनी केली आहे

साथीला आळा बसावा
म्हणून जरी शाळा बंद असल्या
तरीही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या
घरी जावून शिकवावे अशी
ऑर्डर काही संस्थांनी काढल्याने शिक्षकांनी तीव्र शब्दांत
निषेध नोंदविला आहे.

नवनिर्माण सेनेने
महाराष्ट्राच्या सीमेवर
स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक
यंत्रणा ताबडतोब बसविण्याची
मागणी केली आहे.

Read more...

कुशल कारागीर कुणाला म्हणतात?
- विद्याधर सहस्रबुद्धे,
अंबरनाथ
हातोडीने ठोकून स्क्रू बसविणाऱ्यास ‘कुशल कारागीर’ असे म्हणतात.

देशस्थ आणि कोकणस्थ यातला फरक काय?
- गौरव देशपांडे,
कराड
एक अनुभव सांगतो- परवा योगप्रशिक्षण शिबिरात आसनानंतर प्रशिक्षकाने सर्वाना आळस द्यायला सांगितलं, तेव्हा देशस्थाने बाजूच्यास काय सूचना


दिली असं विचारलं. मग आधी उजवा हात वर न्यायचा की डावा हात, असा विचार देशस्थ करत राहिला. त्याआधीच कोकणस्थ आळस देऊन हॉलच्या बाहेर पडला.

काका तुम्ही देव पाहिला आहे का?
- प्रवीण बाष्टे,
रत्नागिरी
परवाच देवाचे वडील म्हणत होते, आमच्या मुलाची एकदा गाठ घालून देतो.

म्ही नायगावचे का हो?
- निलेश सावंत,
भांडुप
नाय बा.

प्रवासात पत्नीबरोबर आणखी काय घ्यावे?
- बी.जे. शेख,
अंधेरी
चहा किंवा शक्य असलेली कोणतेही पेयं.

कतरिना नेहमीच्या पोशाखात येऊन काका म्हणाली तर आपली अवस्था काय असेल?
- अनिल गुडेकर,
मुंबई
मी तिला म्हणेन हे असं का? का?
नायगावकर काका

Read more...

समजूतदारपणा म्हणजे नक्की काय ?

आपल्या अवतीभवतीच्या मूर्ख माणसांशी अ‍ॅडजस्ट होता येणं म्हणजेच ‘समजूतदारपणा’.

Read more...

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP